सर्व 174 उपविधी / प्रकरण XVIII – इतर बाबी
168
उपविधी क्र. 168
सामायिक जागा, अतिक्रमण व वापरबदल
सारांश
जिन्याखालील जागा, गच्ची, मोकळे मैदान, लॉन, क्लब हाऊस, सभागृह इ. कोणालाही भाड्याने/लायसन्सवर देता येत नाहीत. जिने, लँडिंग, पार्किंग, लिफ्ट, कॉरिडॉर यांसारख्या सामायिक जागेवर कोणताही सभासद स्वतःसाठी कब्जा करू शकत नाही. अतिक्रमण करणाऱ्याने ते हटवावे आणि अतिक्रमण काळासाठी दरमहा मासिक देखभाल शुल्काच्या 5 पट रक्कम भरावी. मंजूर नकाशाबाहेर बांधकाम किंवा सदनिकेचा वापरबदल केल्यासही दरमहा 5 पट देखभाल शुल्क (पूर्वलक्षी प्रभावाने).