सोसायटी उपविधी ॲप उघडा

कायदा (लागू कलमे)

कलम 154B-2

सहकारी संस्थांची नोंदणी

मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-२. (१) जर कोणत्याही भाडेकरू सह-भागीदारी गृहनिर्माण संस्थेत किमान पाच व्यक्तींचा (अशा व्यक्तींपैकी प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळया कुटुंबातील सदस्य असली पाहिजे) किंवा किमान एकावन्न टक्के (मंजूर योजनेनुसार सदनिकांच्या एकूण संख्येच्या) इतक्या सदनिका खरेदीदारांचा किंवा इच्छुक सदस्यांचा आणि जे या अधिनियमान्वये सदस्य बनण्यास अर्ह आहेत, यापैकी जे अधिक असतील त्यांचा, समावेश असल्याशिवाय, आणि नोंदणी करावयाच्या गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी प्रस्तावात त्यांचे नाव समाविष्ट असल्याशिवाय अशा कोणत्याही भाडेकरू सह-भागीदारी गृहनिर्माण संस्थेची या अधिनियमान्वये नोंदणी करण्यात येणार नाही.
(२) जर कोणत्याही भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्थेत, किमान पाच सदस्यांचा (अशा व्यक्तींपैकी प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळया कुटुंबातील सदस्य असली पाहिजे) किंवा किमान एकावन्न टक्के (प्रस्तावित किंवा मंजूर अभिन्यासानुसार भूखंडाच्या एकूण संख्येच्या) इतक्या भूखंड खरेदीदारांचा आणि या अधिनियमान्वये जे सदस्य बनण्यास अर्ह आहेत, यांपैकी जे अधिक असतील त्यांचा समावेश असल्याशिवाय आणि नोंदणी करावयाच्या गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी प्रस्तावात त्याचे नाव समाविष्ट असल्याशिवाय अशा कोणत्याही भाडेकरू मालकी गृहनिर्माण संस्थेची या अधिनियमान्वये नोंदणी करण्यात येणार नाही.
(३) संस्थेच्या संघांच्या किमान पाच गृहनिर्माण संस्था ह्या सदस्य असल्याखेरीज अशा कोणत्याही संघीय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही.
(४) सहकारी गृहनिर्माण संघाच्या किमान दोन गृहनिर्माण संस्था किंवा इतर विधिवत संस्था ह्या सदस्य असल्याखेरीज, अशा कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संघाची नोंदणी केली जाणार नाही.
(५) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, २०१९ याच्या प्रारंभापूर्वी केलेल्या कोणत्याही संस्थेच्या नोंदणीकरिता या कलमातील कोणतीही गोष्ट बाधक ठरत असल्याचे मानण्यात येणार नाही.
(६) या अधिनियमान्वये नोंदणी केलेल्या किंवा नोंदणी केल्याचे मानण्यात आलेल्या, मर्यादित किंवा अमर्यादित दायित्व असलेल्या प्रत्येक संस्थेच्या नावामध्ये शेवटचा शब्द हा “ मर्यादित ” किंवा “ अमर्यादित ” असा असेल.
स्पष्टीकरण.—या कलमाच्या प्रयोजनार्थ “ कुटुंबाचा सदस्य ” या शब्दप्रयोगाचा अर्थ, पत्नी, पती, पिता, माता, अवलंबून असणारा मुलगा किंवा अवलंबून असणारी अविवाहित मुलगी, असा आहे.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, 23 जुलै 2019 – सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 (महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2019) – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र

पडताळणी स्थिती: लागू – राजपत्रातील अधिकृत मराठी मजकूर (सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 23). या कलमात 2019 नंतर दुरुस्ती झालेली नाही (चालू इंग्रजी कायद्याशी पडताळले).

शेवटची तपासणी: 01-11-2026

मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-2. (1) No tenant co-partnership housing society shall be registered under this Act, unless it consists of at least five persons (each of such persons being a Member of different family) or at least fifty-one per cent.
(of total number of flats as per sanctioned plan) flat purchasers or intending Members and who are qualified to become Member under this Act, whichever is higher, joins the registration proposal of housing society to be registered.
(2) No tenant ownership housing society shall be registered under this Act, unless it consists of at least five persons (each of such persons being a Member of different family) or at least fifty-one per cent. (of total number of plots as per proposed or sanctioned lay-out) plot purchasers and who are qualified to become Member under this Act, whichever is higher, joins the registration proposal of housing society to be registered.
(3) No Association of society shall be registered unless it has at least five housing societies as its Members.
(4) No Co-operative Housing Association shall be registered unless it has at least two housing societies or other legal bodies as its Members.
(5) Nothing in this section shall be deemed to affect the registration of any society made before the commencement of the Maharashtra Co-operative Societies (Amendment) Act, 2019 (Mah. XXIII of 2019).
(6) The word “limited” or "unlimited" shall be the last word in the name of every society with limited or unlimited liability, as the case may be, which is registered or deemed to be registered under this Act.
Explanation.—For the purpose of this section, the expression “Member of a family” means a wife, husband, father, mother, dependent son or unmarried dependent daughter.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 – इंग्रजी आवृत्ती (Text as on 6th June 2025) – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

पडताळणी स्थिती: लागू – चालू कायद्याचा मजकूर (6 जून 2025 पर्यंतच्या दुरुस्त्यांसह), अधिकृत प्रतीशी शब्दशः पडताळलेला. प्रकरण XIII-B: महाराष्ट्र अधिनियम क्र. XXIII of 2019.

शेवटची तपासणी: 01-11-2026

संबंधित विषय

सभासदत्व

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →