सोसायटी उपविधी ॲप उघडा

कायदा (लागू कलमे)

कलम 154B-21

महिलांसाठी आरक्षण

मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-२१. (१) या अधिनियमात किंवा त्याखाली केलेल्या नियमांत किंवा सहकारी संस्थेच्या कोणत्याही उप-विधींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, व्यक्तिगत सदस्य म्हणून अंतर्भाव असणाऱ्या, आणि व्यक्तींच्या अशा वर्गामधील किंवा प्रवर्गामधील सदस्य असणाऱ्या, प्रत्येक संस्थेच्या समितीवर महिला सदस्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, महिलांकरिता दोन जागा राखीव ठेवण्यात येतील.
(२) संस्थेची कोणतीही व्यक्तिगत महिला सदस्य किंवा सदस्य संस्थेच्या समितीवरील कोणतीही महिला सदस्य,— मग ती निवडून आलेली, स्वीकृत केलेली किंवा नामनिर्देशित केलेली असो— पोट-कलम (१) अन्वये राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास पात्र असेल.
(३) या कलमातील कोणतीही गोष्ट, केवळ महिला सदस्य असणाऱ्या संस्थेच्या समितीस लागू होणार नाही.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, 23 जुलै 2019 – सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 (महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2019) – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र

पडताळणी स्थिती: लागू – राजपत्रातील अधिकृत मराठी मजकूर (सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 23). या कलमात 2019 नंतर दुरुस्ती झालेली नाही (चालू इंग्रजी कायद्याशी पडताळले).

शेवटची तपासणी: 01-11-2026

मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-21. (1) Notwithstanding anything contained in this Act or in the rules made thereunder, or in the by-laws of any society, there shall be two seats reserved for women on the Committee of each society consisting of individuals as Members and having Members from such class or category of persons, to represent the women Members.
(2) Any individual woman Member of the society, or any woman Member of the Committee of a Member-society, whether elected, co-opted or nominated, shall be eligible to contest the election to the seat reserved under sub-section (1).
(3) Nothing in this section shall apply to a Committee of a society exclusively of women Members.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 – इंग्रजी आवृत्ती (Text as on 6th June 2025) – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

पडताळणी स्थिती: लागू – चालू कायद्याचा मजकूर (6 जून 2025 पर्यंतच्या दुरुस्त्यांसह), अधिकृत प्रतीशी शब्दशः पडताळलेला. प्रकरण XIII-B: महाराष्ट्र अधिनियम क्र. XXIII of 2019.

शेवटची तपासणी: 01-11-2026

संबंधित विषय

समिती व निवडणूक

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →