कलम 154B-24
संस्थेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-२४. (१) जो अधिकारी त्या पदावरील त्याच्या निवडीच्या आधारे पद धारण करीत असेल अशा अधिकाऱ्याविरुद्ध समितीच्या बैठकीला जे सदस्य उपस्थित असतील आणि त्या बैठकीत जे मतदान करण्यास पात्र असतील त्या सदस्यांच्या दोन तृतीयांशपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांच्या बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजूर केला असेल तर, तो अधिकारी त्या पदावर असण्याचे बंद होईल आणि त्यानंतर त्याचे पद रिक्त झाले असल्याचे मानण्यात येईल. (२) कलम ७३एक-ड ची पोट-कलमे (२) ते (७) यांच्या तरतुदी, अशा ठरावास योग्य त्या फेरफारांसह लागू असतील.
मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-24. (1) An officer who holds office by virtue of his election to that office shall cease to be such officer if a motion of no confidence is passed at a meeting of a Committee by not less than two third majority of the Committee Members who are present and entitled to vote at such meeting and his office shall thereupon be deemed to be vacant. (2) The provisions of sub-sections (2) to (7) of section 73ID shall apply mutatis mutandis to such motion.