सोसायटी उपविधी ॲप उघडा

कायदा (लागू कलमे)

कलम 154B-26

चिठ्ठ्या काढून भूखंडांचे, सदनिकांचे किंवा घरांचे नियतवाटप करणे

मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-२६. (१) एतद्विरूद्ध कोणतीही संविदा केली असेल ती खेरीजकरून, या अधिनियमाच्या व त्याखाली केलेल्या नियमांच्या आणि यथोचितरीत्या नोंदणी केलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या उप-विधींच्या तरतुदींनुसार गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून ज्या सदस्यांची नावनोंदणी योग्य असल्याचे आढळून आले असेल अशा सदस्यांच्या बाबतीत, काटेकोरपणे चिठ्ठ्या टाकून काढलेल्या सोडतीच्या आधारेच केवळ त्या सदस्यांना गृहनिर्माण संस्थेच्या समितीकडून भूखंडांचे, सदनिकांचे, घरांचे किंवा इतर निवासी युनिटांचे नियतवाटप करण्यात येईल.
(२) जी संस्था—मग ती महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, २०१९ याच्या प्रारंभापूर्वी किंवा त्यानंतर नोंदणीकृत केलेली असो वा नसो—अशा एखाद्या गृहनिर्माण संस्थेचा असा प्रत्येक सदस्य, ज्याला भूखंडांचे, सदनिकांचे, घरांचे किंवा इतर निवासी युनिटांचे वाटप करण्यात आलेले आहे, त्याला विहित करण्यात येईल अशा नमुन्यात, अशा अटींवर व अशा शर्तीवर गृहनिर्माण संस्थेकडून तिच्या मोहोरेनिशी व स्वाक्षरीने वाटप प्रमाणपत्र देण्यात येईल. गृहनिर्माण संस्थेकडून निर्धारित आणि अधिसूचित करण्यात येईल अशा सर्व देय रकमांचे सदस्याकडून यथोचितरित्या प्रदान करण्यात येईल तेव्हा, असे प्रमाणपत्र तात्काळ देण्यात येईल.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, 23 जुलै 2019 – सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 (महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2019) – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र

पडताळणी स्थिती: लागू – राजपत्रातील अधिकृत मराठी मजकूर (सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 23). या कलमात 2019 नंतर दुरुस्ती झालेली नाही (चालू इंग्रजी कायद्याशी पडताळले).

शेवटची तपासणी: 01-11-2026

मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-26. (1) Except when there is a contract to the contrary, allotment of plots of land, flats, house or other dwelling units shall be made by the Committee of a housing society to the Members strictly on the basis of draw of lots in respect of such Members whose enrollment as a Member of a housing society is found proper in accordance with provisions of this Act and rules framed thereunder and the bye-laws of a housing society duly registered.
(2) Every Member of a housing society, whether registered before or after the commencement of the Maharashtra Co-operative Societies (Amendment) Act, 2019 (Mah. XXIII of 2019), to whom plots, flats, houses or other dwelling units have been allotted, shall be issued certificate of allotment by the co-operative housing society under its seal and signature in such form, on such terms and on such conditions as may be prescribed. Such certificate shall be issued forthwith when all the dues as may be determined and notified by the housing society are duly paid by the Member.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 – इंग्रजी आवृत्ती (Text as on 6th June 2025) – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

पडताळणी स्थिती: लागू – चालू कायद्याचा मजकूर (6 जून 2025 पर्यंतच्या दुरुस्त्यांसह), अधिकृत प्रतीशी शब्दशः पडताळलेला. प्रकरण XIII-B: महाराष्ट्र अधिनियम क्र. XXIII of 2019.

शेवटची तपासणी: 01-11-2026

संबंधित विषय

सभासदत्व

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →