कलम 154B-30
ज्यांनी आपली उद्दिष्टे साध्य केलेली आहेत अशा सहकारी गृहनिर्माण संस्था
मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-३०. गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत जेथे त्या गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांना सर्व भूखंडांचे वाटप केलेले असेल आणि पायाभूत नागरी सेवा, स्थानिक नागरी संस्थेकडे हस्तांतरित केलेल्या असतील, तेथे निबंधक, समितीला साठ दिवसांची नोटीस दिल्यानंतर, समापन कार्यवाहीस प्रारंभ करील आणि अशा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे समापन करण्यात येईल : परंतु, एखाद्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत, जेथे जमीन अखंड भाडेपट्टयावर वाटप केली असेल तेथे, समापन आदेश मंजूर करण्यापूर्वी पट्टाकाराची पूर्वसंमती प्राप्त करण्यात येईल : परंतु आणखी असे की, जेथे पट्टाकाराकडून एखाद्या गृहनिर्माण सहकारी संस्थेला क्लब, शाळा, समाजकेंद्र, दवाखाना किंवा सामुदायिक सुविधा केंद्र, इत्यादी चालविण्याकरिता जमीन देण्यात आली असेल तेथे, जर अधिमंडळाने सदस्यांच्या आणि निवासाच्या लाभाकरिता, हे उपक्रम चालविण्याचा निर्णय घेतला असेल तर, अशा सहकारी गृहनिर्माण संस्थेला वरील तरतुदी लागू होणार नाहीत.
मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-30. In case of a house building society where all plots have been allotted to its Members and basic civic service have been transferred to the local civic body, the Registrar shall, after giving sixty days notice to the Committee, initiate winding up proceedings and such co-operative house building society shall be wound up : Provided that, in the case of a co-operative house building society where land has been allotted on perpetual lease, before passing winding up orders the prior consent of the lessor shall be obtained : Provided further that, where a house building co-operative society has been provided land to run a club, school, community center, dispensary or community facility, etc., by the lessor, the above provision shall not apply to such co-operative house building society, if the general body decides to run these activities for the benefit of the Members and the residence.