कलम 154B-5
सदस्यत्वावरील मर्यादा
मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-५. गृहनिर्माण संस्था, त्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये नियतवाटपासाठी उपलब्ध असतील अशा सदनिकांच्या किंवा, यथास्थिति, भूखंडांच्या संख्येपेक्षा जास्त व्यक्तींना तिच्या सदस्यकुलात दाखल करून घेणार नाही : परंतु, भूखंड मालकांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेस, जर भूखंड मालकाने प्रचलित नियमांनुसार सदनिकांचे बांधकाम केलेले असल्यास आणि सदनिकांची विक्री केली असल्यास, मूळ भूखंड मालक सदस्याच्या जागी सदनिका खरेदीदारांच्या (सहकारी गृहनिर्माण संस्था, कंपनी, संघ, इत्यादी) संघटनेला आपल्या सदस्यकुलात दाखल करून घेता येईल.
मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-5. A housing society shall not admit to its Membership persons exceeding the number of flats or plots, as the case may be, available for allotment in that co-operative housing society : Provided that, a plot owners co-operative housing society may admit to its Membership an organization (co-operative housing society, company, association, etc.) of flat purchasers, in case the plot owner had constructed and sold flats as per prevailing rules, in place of original plot owner Member.