सोसायटी उपविधी ॲप उघडा

कायदा (लागू कलमे)

कलम 154B-9

सदस्याला काढून टाकणे

मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-९. जेव्हा एखाद्या व्यक्तीला संस्थेच्या सदस्यकुलात यथोचितरीत्या दाखल करून घेण्यात आले आहे किंवा कसे याबाबत अथवा या अधिनियमाच्या, नियमांच्या आणि उप-विधींच्या तरतुदींचे उल्लंघन करून तिला दाखल करून घेण्यात आले आहे किंवा कसे याबाबत तिच्या सदस्यत्वाविषयी कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास, निबंधक स्वतःहून किंवा एखाद्या अर्जावरून, अशा अर्जाच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत अशा प्रश्नावर निर्णय देईल आणि या अधिनियमाच्या, नियमांच्या व उप-विधींच्या तरतुदींचे उल्लंघन करून त्या व्यक्तीला सदस्यकुलात दाखल करून घेण्यात आले असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यास, तो अशा व्यक्तीला सदस्यकुलातून काढून टाकण्याचा आदेश देईल, परंतु अशा कोणत्याही सदस्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याखेरीज त्याला प्रतिकूल असलेला असा कोणताही आदेश देण्यात येणार नाही.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, 23 जुलै 2019 – सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 (महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2019) – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र

पडताळणी स्थिती: लागू – राजपत्रातील अधिकृत मराठी मजकूर (सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 23). या कलमात 2019 नंतर दुरुस्ती झालेली नाही (चालू इंग्रजी कायद्याशी पडताळले).

शेवटची तपासणी: 01-11-2026

मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-9. When any question arises in respect of a Membership of a person as to whether he has been duly admitted to the Membership of society or has been admitted in violation of the provisions of this Act, rules and bye-laws, the Registrar suo motu or on an application shall decide such question within three months from the date of application and if he is satisfied that the person has been admitted as Member in violation of provisions of this Act, rules and bye-laws, pass an order to remove such person from Membership, but no such order adverse to any such Member shall be given without giving him an opportunity of being heard.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 – इंग्रजी आवृत्ती (Text as on 6th June 2025) – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

पडताळणी स्थिती: लागू – चालू कायद्याचा मजकूर (6 जून 2025 पर्यंतच्या दुरुस्त्यांसह), अधिकृत प्रतीशी शब्दशः पडताळलेला. प्रकरण XIII-B: महाराष्ट्र अधिनियम क्र. XXIII of 2019.

शेवटची तपासणी: 01-11-2026

संबंधित विषय

सभासदत्वतक्रार कुठे करावी

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →