सोसायटी उपविधी ॲप उघडा

कायदा (लागू कलमे)

कलम 154B-7

सदस्याच्या भागाच्या किंवा हितसंबंधाच्या हस्तांतरणावरील

मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-७. या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, एखाद्या गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत, सदस्यांचे वारस किंवा त्याचा नामनिर्देशिती यांच्याकडे हस्तांतरणाखेरीज, त्या सदस्याच्या भागाचे किंवा
हितसंबंधाचे किंवा भोगवटा हक्काचे हस्तांतरण हे,— निर्बंध. (अ) गृहनिर्माण संस्थेची देणी चुकती केल्याखेरीज ;
(ब) हस्तांतरितीने योग्य कालावधीत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला असल्याखेरीज आणि ते संपादित केले असल्याखेरीज, परिणामक होणार नाही :
परंतु, पट्टा धारण केलेल्या मालमत्तांच्या संबंधातील भागाचे किंवा हितसंबंधाचे हस्तांतरण हे, गृहनिर्माण संस्थेकडील जमिनीच्या पट्ट्याशी किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेने तिच्या सदस्यांना दिलेल्या पट्ट्याशी विसंगत नसतील अशा पट्ट्याच्या शर्तीद्वारे नियमित केले जाईल.
स्पष्टीकरण.—या कलमाच्या प्रयोजनार्थ, भोगवटा हक्कामध्ये भाडेकरूच्या किंवा संमती-नि- परवानगी तत्त्वावरील लायसन धारकाच्या हक्काचा समावेश असणार नाही.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, 23 जुलै 2019 – सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 (महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2019) – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र

पडताळणी स्थिती: लागू – राजपत्रातील अधिकृत मराठी मजकूर (सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 23). या कलमात 2019 नंतर दुरुस्ती झालेली नाही (चालू इंग्रजी कायद्याशी पडताळले).

शेवटची तपासणी: 01-11-2026

मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-7. Subject to the provisions of this Act, in case of a housing society, no transfer of share or interest of a Member or the occupancy right, except the transfer of his heir or a nominee, shall be effective unless,–
(a) the dues of housing society are paid ;
(b) the transferee applies and acquires Membership of the co-operative housing society in due course of time :
Provided that, the transfer of share or interest in respect of lease hold properties shall be governed by the terms of the lease, which are not inconsistent with lease of land to the co-operative housing society or with lease by housing society to its Members.
Explanation.— For the purpose of this section, occupancy right shall not include right of a tenant or a licensee on leave and license basis.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 – इंग्रजी आवृत्ती (Text as on 6th June 2025) – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

पडताळणी स्थिती: लागू – चालू कायद्याचा मजकूर (6 जून 2025 पर्यंतच्या दुरुस्त्यांसह), अधिकृत प्रतीशी शब्दशः पडताळलेला. प्रकरण XIII-B: महाराष्ट्र अधिनियम क्र. XXIII of 2019.

शेवटची तपासणी: 01-11-2026

संबंधित विषय

सदनिका हस्तांतरण / विक्रीभाड्याने देणे

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →