सर्व 174 उपविधी / प्रकरण VII – सभासद, हक्क, नामनिर्देशन व हस्तांतरण
उपविधी क्र. 37
सदनिका / भाग हस्तांतरण (Transfer)
Transfer of Shares and interest in the Capital/Property of the Society
सारांश
सदनिका विकणाऱ्या सभासदाने खरेदीदाराच्या संमतीसह 15 दिवसांची नोटीस द्यावी. हस्तांतरणासाठी संस्थेचे 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) आवश्यक नाही. कागदपत्रे: हस्तांतरण अर्ज व भाग प्रमाणपत्र, खरेदीदाराचा सभासदत्व अर्ज, विक्रेत्याचा राजीनामा, नोंदणीकृत व मुद्रांक शुल्क भरलेला करार, देणी भरण्याचे हमीपत्र. हस्तांतरण शुल्क रु. 500, प्रवेश शुल्क रु. 100, आणि प्रीमियम शासन परिपत्रकातील मर्यादेत (सभा ठरवेल तो). यापेक्षा जास्त देणगी/इतर रक्कम घेता येत नाही. कुटुंबातील हस्तांतरण, वारस/नामनिर्देशिती व सदनिका अदलाबदलीला प्रीमियम लागत नाही.
या उपविधीबद्दल नेहमीचे प्रश्न
सदनिका (फ्लॅट) विकताना सोसायटीची NOC लागते का?सदनिका हस्तांतरण शुल्क व प्रीमियम किती घेता येतो?