कलम 154B-17
निधींची गुंतवणूक
मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-१७. संस्था तिच्या निधींची पुढील एक किंवा अनेक प्रकारांमध्ये म्हणजे— करणे. (अ) मागील तीन लागोपाठच्या वर्षांमध्ये किमान “ ए ” लेखापरीक्षा दर्जा प्राप्त केलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये, राज्य सहकारी बँकेमध्ये आणि अशी कोणतीही मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यामध्ये उपलब्ध नसेल तर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ; (ब) भारतीय न्यास अधिनियम, १८८२ याच्या कलम २० मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही रोख्यांमध्ये ; (क) अन्य कोणत्याही संस्थेने मर्यादित दायित्वासह काढलेल्या भागांमध्ये किंवा प्रतिभूति बंधपत्रांमध्ये किंवा ऋणपत्रांमध्ये ; (ड) राज्य शासनाने नियमांद्वारे किंवा त्याबाबतीत काढलेल्या सर्वसाधारण वा विशेष आदेशाद्वारे परवानगी दिलेल्या अन्य कोणत्याही प्रकारांमध्ये, तिच्या निधीची गुंतवणूक करील किंवा ते जमा करील.
मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-17. A society shall invest or deposit its funds in one or more of the following :— (a) in a District Central Co-operative Bank, the State Co-operative Bank, having awarded at least “A” Audit Class in last three consecutive years, if no such Central Co-operative Bank is available in district, then any Nationalised Bank ; (b) in any of the securities specified in section 20 of the Indian Trusts Act, 1882 ; (c) in the shares, or security bonds, or debentures, issued by any other society with limited liability ; (d) in any other mode permitted by the rules, or by general or special order issued in that behalf by the State Government.